“National Nutrition Month Celebration” by the Department of Food Science and Nutrition, in collaboration with HAN and Health Care Centre, and “PMOS Awareness: Vijeyata Program,” a public health initiative of the PCOS Society of India.

“नाशिकच्या एस एम आर के महिला महाविद्यालयात PCOS सोसायटी तर्फे ‘विजयता’ जनजागृती कार्यक्रम”

नाशिक : पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) विषयी जनजागृती तसेच महिलांच्या आरोग्याबाबत वैज्ञानिक आणि पुराव्यावर आधारित दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने PCOS Society of India तर्फे ‘विजयता – विज्ञानाच्या पाठीशी, तिच्या साथीशी’ हा जनजागृतीपर उपक्रम ९ सप्टेंबर २०२६ रोजी SMRK-BK-AK महिला महाविद्यालय, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे आणि महाविद्यालयच्या प्राचार्य डॉ. संध्या खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच Department of Food Science and Nutrition, HAN आणि महाविद्यालयाच्या Health Care Centre यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमात डॉ. गौरी करंदीकर आणि डॉ. विक्रांती मोरे यांची PCOS विषयावर जनजागृतीपर व्याख्याने होतील. त्यानंतर डॉ. उज्ज्वला भांबरी आणि सौ. विशाखा गोरे यांच्या सूत्रसंचालनाखाली तज्ज्ञ परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. मयुरी केळकर, डॉ. मैथिली कश्यपे, डॉ. रुचा सुले, डॉ. मीनल कोतकर आणि सौ मीनल झंवर सहभागी होणार आहेत.

PCOS संदर्भातील गैरसमज दूर करणे, योग्य वेळी पुराव्यावर आधारित उपचार घेण्याचे महत्त्व, तसेच आरोग्यदायी जीवनशैली आणि योग्य आहाराच्या सवयी याबाबत मार्गदर्शन हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. तरुणींना अचूक आरोग्यविषयक माहिती मिळावी आणि त्यांच्या आरोग्याबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी त्यांना सक्षम करता यावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

‘विज्ञानाच्या पाठीशी, तिच्या साथीशी!’ हा संदेश देत अंधश्रद्धा व गैरसमजांऐवजी ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आरोग्यजागरूकतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.

S.M.R.K B.K A.K Mahila Mahavidyalaya,Nashik, affiliated to SNDT Women’s University, Mumbai, Department of Computer is organizing a UNIVERSITY level online Workshop on “Content Analysis and Question Bank Preparation for B.Com in Computer Application” under the faculty of Commerce and Management. On date 31st August, 2026

S.M.R.K B.K A.K Mahila Mahavidyalaya,Nashik, affiliated to SNDT Women’s University, Mumbai, Department of Computer is organizing a UNIVERSITY level online Workshop on “Content Analysis and Question Bank Preparation for B.Com in Computer Application” under the faculty of Commerce and Management. On date 31st August, 2026