गोखले एज्युकेशन सोसायटीचे एस.एम.आर.के.-बी.के.-ए.के. महिला महाविद्यालय, नाशिक येथील मराठी विभागातर्फे संस्थापक प्राचार्या कै. डॉ. सौ. सुनंदाताई गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता “समकालीन कथेतून येणाऱ्या स्त्रीविषयक जाणीवा” या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्थळ – शर्मन हॉल, गुरुदक्षिणा कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड, नाशिक. आयोजक – मराठी विभाग, एस.एम.आर.के.-बी.के.-ए.के. महिला महाविद्यालय, नाशिक.

