२० ऑगस्ट हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्मदिन. भारत सरकारच्या वतीने हा दिवस ‘सद् भावना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील सर्व धर्मीयांमध्ये एकोपा वाढावा, शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने सद् भावनेची गरज आजच्या काळात महत्त्वाची आहे. या अनुषंगाने महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने सद् भावनेची सामुहिक शपथ विद्यार्थ्याना देण्यात आली. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कविता पाटील यांनी सदर शपथ विद्यार्थीनींना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन रा.से.यो.च्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.गीता यादव यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नीलम बोकील व प्राध्यापक वृंद उपस्थित होता.


