महत्त्वाची सूचना सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कळविण्यात येत की, SNDT परिपत्रक क्रमांक /Covid 19/2019-20 दि. 27/3/2020 नुसार घरुनच कामे करावयाची असल्याने महाविद्यालय दि. 1/4/2020 ते 14/4/2020 पर्यंत ‘Lock Down’ मुळे बंद राहील. तसेच सर्व प्राध्यापकांनी वर्क फॉर्म होम चालु ठेवायचे आहे याची नोंद घ्यावी.

-प्राचार्या

एस. एम. आर के. बी. के. ए. के. महिला महाविद्यालय.

आपल्या वरिष्ठ महाविद्यालयातील एस.एन.डी.टी. विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या १८/०३/२०२० ते ३१/०३/२०२० पर्यंतच्या सर्व तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तसेच दि. ०१ एप्रिल २०२० पासूनची परीक्षा व प्रात्यक्षिके पूर्व नियोजित वेळापत्रकानुसारच होतील. तसेच ११ वी इयत्तेच्या मार्च/एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा संस्थेच्या पुढील आदेशापर्यंत (दि. ३१ मार्च २०२० पर्यंत) स्थगित करण्यात आलेल्या आहेत. इयत्ता ११ वी चे सुधारित वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच दि. ३१ मार्च २०२० सर्व विद्यार्थिनींना महाविद्यालयास सुट्टी देण्यात आलेली आहे. वरील विषयाबाबत शासनाकडून सुधारित आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना त्याबाबत कळविण्यात येईल.

  1. आपल्या वरिष्ठ महाविद्यालयातील एस.एन.डी.टी. विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या १८/०३/२०२० ते ३१/०३/२०२० पर्यंतच्या सर्व तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तसेच दि. ०१ एप्रिल २०२० पासूनची परीक्षा व प्रात्यक्षिके पूर्व नियोजित वेळापत्रकानुसारच होतील.
  2. तसेच ११ वी इयत्तेच्या मार्च/एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा संस्थेच्या पुढील आदेशापर्यंत (दि. ३१ मार्च २०२० पर्यंत) स्थगित करण्यात आलेल्या आहेत. इयत्ता ११ वी चे सुधारित वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
  3. तसेच दि. ३१ मार्च २०२० सर्व विद्यार्थिनींना महाविद्यालयास सुट्टी देण्यात आलेली आहे.

वरील विषयाबाबत शासनाकडून सुधारित आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना त्याबाबत कळविण्यात येईल.

प्राचार्या

Read More

सर्व महाविद्यालयातील अध्यापक हे दिनांक २५/०३/२०२० पर्यंत घरी राहून कामकाज (Work from home) करू शकतील. तथापी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अध्यापकांना महाविद्यालयात तातडीने हजर रहाणे बंधनकारक राहील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील नोटीस बोर्डवर दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

मराठी राजभाषा दिन कार्यक्रम सोमवार, २ मार्च २०२०

महाराष्ट्र शासनाच्या वतीने २७ फेब्रुवारी हा दिवस कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम सोमवार दिनांक २ मार्च २०२० रोजी आयोजित करण्यात आला होता. नाशिक येथे राहणारे मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार श्री. संतोष वाटपाडे यांना या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मराठी ‘भाषा आणि आपण’ या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी आपले मौलिक विचार याप्रसंगी मांडले. आपल्या स्वरचित कविता आणि गझल सादरीकरणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी देखील काव्यवाचन केले. त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तक आणि पुष्प देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती. साधना देशमुख या होत्या. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विवेक खरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. रत्नप्रभा पगारे यांनी व आभारप्रदर्शन प्रा. कल्पना पवार यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कविता पाटील, डॉ. नीलम बोकील असेच अन्य प्राध्यापक वृंद उपस्थित होता.