मराठी राजभाषा दिन कार्यक्रम सोमवार, २ मार्च २०२०

महाराष्ट्र शासनाच्या वतीने २७ फेब्रुवारी हा दिवस कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम सोमवार दिनांक २ मार्च २०२० रोजी आयोजित करण्यात आला होता. नाशिक येथे राहणारे मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार श्री. संतोष वाटपाडे यांना या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मराठी ‘भाषा आणि आपण’ या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी आपले मौलिक विचार याप्रसंगी मांडले. आपल्या स्वरचित कविता आणि गझल सादरीकरणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी देखील काव्यवाचन केले. त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तक आणि पुष्प देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती. साधना देशमुख या होत्या. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विवेक खरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. रत्नप्रभा पगारे यांनी व आभारप्रदर्शन प्रा. कल्पना पवार यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कविता पाटील, डॉ. नीलम बोकील असेच अन्य प्राध्यापक वृंद उपस्थित होता.