महाराष्ट्र शासनाच्या पत्रान्वये गुरुवार, २९ ऑगस्ट २०१९ ह्या दिवशी सुदृढ भारत अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे कळविण्यात आले होते. या अनुषंगाने महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने विद्यार्थिनींना व्यायामाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कविता पाटील यांनी विद्यार्थीनींना शारीरिक सुदृढते बरोबरच मनाची सुदृढता कशी महत्त्वाची आहे हे सांगितले. दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्वही त्यांनी पटवून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणानंतर विद्यार्थिनींनी व प्राध्यापकांनी महाविद्यालय व संस्थेच्या परिसरात पायी फेरी काढून व्यायामाचे महत्त्व याचा संदेश सर्व विद्यार्थ्याना दिला. ‘सुदृढ भारत घडवूया रोज व्यायाम करुया’ अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.विवेक खरे यांनी केले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नीलम बोकील, कार्यक्रम अधिकारी डॉ. गीता यादव व अन्य प्राध्यापक वृंद यावेळी उपस्थित होता.




